ब्रेकिंग न्यूज़स्वास्थ्य

जीवनात स्वास्थ आणि सामंजस्य चा मार्ग

फालुन दाफा :-आज आपले जीवन जलद तसेच गतिमान झालेले आहे. अश्या जीवनात सर्वच एक रोगमुक्त शरीर आणि चिंता तसेच तणावापासून मुक्त मनाची इच्छा बाळगतात. परंतू जितके आपण हे लक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तेवढाच तो दूर गेलेला जाणवतो. कुटंबीय समस्या, नौकरीचा दबाव, इतरांशी संघर्ष वा मतभेद, तसेच आपल्या प्रियजणांच्या आरोग्य समस्या – या गोष्टींचा अंत दिसेनासा आहे. आजच्या जीवनातील समस्यांचा आपल्या कडे कुठला उपाय आहे?

जगभरातील लाखो लोकांना फालुन दाफा (किंवा फालुन गोंग) ध्यान अभ्यासात त्यांची उत्तरे मिळाली. फालुन दाफा मध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकविले जातात. हे व्यायाम व्यक्तिच्या उर्जा वाहिन्यांना उघडणे, शरीराचे शुद्धीकरण करणे, तणाव मुक्त करणे तसेच आंतरिक शांतता प्रदान करण्यास सहायता करते. मन आणि शरीराची एक परिपूर्ण अभ्यास असल्या कारणाने या अभ्यासामुळे लोकांना अल्प वेळेतच आश्चर्यकारक स्वास्थ्य लाभ प्राप्त होतात.

आज जगभरातील लाखो लोकांनी फालुन दाफा अभ्यास प्रणालीला आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग मानला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांनी स्वास्थ आणि सामंजस्यपूर्ण जीवनाच्या दिशेने यास आपल्या काळाचा एक योग्य आणि सुखद निवेश मानला आहे. हे शिकण्यासाठी एक निर्मळ मन आणि उदार हृदयाची आवश्यकता आहे. तुम्ही देखील स्वतः हा अनमोल ध्यान अभ्यास शिकू शकता आणि याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

फालुन गोंग चा अभ्यास आज जगभरात लोकप्रिय आहे. चीन हे फालुन गोंगचे जन्मस्थळ आहे, परंतू दु:खद बाब ही आहे की चीनमध्येच या अभ्यासावर बंदी आणून, चीनी कम्युनिस्ट पार्टी द्वारे १९९९ पासून यावर अत्याचार केल्या जात आहे. जे आजवर सुरु आहे. २० जुलै १९९९ ला फालुन गोंगला औपचारिक रूपाने चीनमध्ये बेकायदेशीर घोषित करण्यात आले.
फालुन दाफा चे साधक या अमानवीय अत्याचाराविरोधात आवाज उठवित आहेत. तसेच जगभरातील लोकांना याबाबत अवगत करीत आहेत.

आपल्या देशात देखील हजारो संख्येने दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, नागपूर, पुणे तसेच इतर शहरांत देखील फालुन दाफाचा अभ्यास केल्या जात आहे. फालुन दाफा देशभरांत कार्पोरेट जगत, अनेक शाळां तसेच कॉलेज मध्ये परिचित करण्यात आलेले आहे. तसेच वेळोवेळी याचे प्रदर्शन सार्वजनिक स्थळे, पुस्तक प्रदर्शनी तथा अनेक मोठ्या प्रदर्शनीत केला जातो.

व्यायामांचा संदर्भ खाली दिल्या प्रमाणे :

1) बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन : ह्या व्यायामाची मध्यवर्ती संकल्पना तणावाद्वारे सर्व ऊर्जा नलिकांना उघडणे आहे. सर्व ऊर्जा नलिका प्रारंभापासूनच उघडल्या जातात ज्यामुळे अभ्यासी लगेच उच्च स्तरावर अभ्यास करू शकतो. हा अभ्यास करतांना साधकास शरीर उबदार वाटेल आणि विशेष संवेदना जाणवेल की जणू तेथे खूप प्रभावशाली ऊर्जा क्षेत्र आहे.
2) फालुन स्थिर मुद्रा : या व्यायामात शांत उभे राहून चार वेगवेगळया स्थितीमध्ये चक्र धारण करावयाचे आहे. यात हालचाल कमी असून प्रत्येक स्थितीमध्ये बराच वेळ राहण्याची आवश्यकता आहे. फालुन स्थिर मुद्रा, साधनेची एक व्यापक पद्धती आहे जी ज्ञानामध्ये वृद्धी करते, स्तर उंचावते आणि शक्ती सामर्थ्य सुदृढ करते.
3) विश्वाचे दोन टोकांचे भेदन : या व्यायामाचे उद्देश विश्वाच्या ऊर्जेचा शरीरातील ऊर्जेशी मिश्रण आणि विलिनीकरण करने आहे. या अभ्यासा दरम्यान अधिक मात्रेत अशुध्द ऊर्जा बाहेर काढली जाते तसेच शुद्ध ऊर्जा घेतली जाते. फार कमी वेळेत रोगग्रस्त ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर काढल्या जाऊ शकते तथा समुचित मात्रेत विश्वातील ऊर्जा आत घेतल्या जाऊ शकते. ज्यामुळे शरीर निर्मल व शुद्ध होते.

4) फालुन दिव्य परिपथ परिक्रमा : हा अभ्यास मनुष्याच्या शरीरातील ऊर्जेला एका मोठ्या क्षेत्रात फैलाव करण्यास योग्य बनवितो. मागील तीन अभ्यासाच्या आधारावर ह्या अभ्यासाचा उद्देश शरीरातील सर्व ऊर्जा प्रवाहधारांना उघडणे आहे (महान दिव्य परीक्रमेसहित), ज्यामुळे ऊर्जा प्रवाहधारा हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये वरून खालपर्यंत जुळतात.
5) दिव्य शक्तींना सुदृढ करने : एक शांतिपूर्ण ध्यान अभ्यास आहे. यात शांत अवस्थेत जास्तीत जास्त वेळ बसण्याची आवश्यकता आहे. ज्याचा हेतू शक्ती सामर्थ्य आणि दिव्य शक्तिंना सुदृढ करने आहे.

कोरोना काळात बाह्य गतिविधी करणे सीमित असल्यामुळे हा अभ्यास ऑनलाईन शिकविल्या जात आहे.

शिकण्यास इच्छुक असल्यास www.learnfalungong.in वर वेबिनार साठी नि:शुल्क रजिस्टर करू शकता.

फालुन दाफा ची पुस्तकें, व्यायाम निर्देश आणि अभ्यास स्थळांची अधिक माहिती या वेबसाइट www.falundafa.org आणि www.falundafaindia.org वर उपलब्ध आहे.

शिकण्यास संपर्क करावा : नागपूर : 9822569386 पुणे : 7720006453, 9004250296, मुंबई : 9987645170

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button